चिपळुणातील अश्वारूढ शिवाजी महाराज पुतळा सुशोभिकरण कामाची होणार चौकशी
नगर पालिका हद्दीत सुरू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याभोवती भिंतीवर दगडी आच्छादनाचे काम बोगस अंदाजपत्रकाद्वारे सुरू असून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली होती. या तक्रारींची जिल्हा सहआयुक्त तुषार बाबर यांनी गंभीर दखल घेतली आहे. शहरात सुरू असलेल्या शिव पुतळा परिसर सुशोभिकरण कामाची चौकशी करून स्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी नगर पालिका प्रशासनाला दिले आहेत.www.konkantoday.com