खेड कॉंग्रेस तालुकाध्यक्षपदी अखेर अजित सुर्वे यांची नियुक्ती
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब यांनी तीन पदााधिकार्यांच्या केलेल्या निलंबनानंतर ६ जणांना बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीनंतर अंतर्गत गटबाजी उफाळून आली होती. अखेर पक्षनेतृत्वाने गौस खतीब यांना पदावरून हटवून तालुकाध्यक्ष पदाची जबाबदाी खाडीपट्ट्यातील सवणस खुर्द येथील अजित सुर्वे यांच्याकडे सोपवली आहे. जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी तसे त्यांना नियुक्तीपत्रही दिले आहे. www.konkantoday.com