चिवेली गावात सेल्फी विथ खड्डा, लक्ष वेधण्यासाठी आगळा उपक्रम

चिवेली ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा आणि आंदोलने केल्यानंतर कौंढरताम्हाणे ते चिवेली लोणारी बंदर रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला. त्यासाठी साडेचार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या रस्त्यावर पावसाळ्यात सातत्याने खड्डे पडतात. संबंधित विभागास निवेदन देवूनही फरक पडत नाही. त्यामुळे चिवेली सरपंच योगेश शिर्के यांनी नामी शक्कल लढवत अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या मार्गावर चिवेली ग्रामपंचायत हद्दीत सेल्फी विथ खड्डा स्पर्धा घेत संबंधित विभागास जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button