शेअरमार्केटमध्ये जास्त फायद्याचे आमिष दाखवून १८ लाखांची बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
रत्नागिरी येथील राहणारे बांधकाम व्यावसायिक दिनेश जैन यांना शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून पैसे गुंतवण्यास भाग पाडून १७ लाख ८४ हजार रुपयांची अज्ञात इसमाने फसवणूक करण्याचा प्रकार घडला आहे. यातील फिर्यादी हे सोशल मिडियावरून शेअर मार्केट संबंधिची माहिती घेत असताना यातील मॅक्सीमा फायनान्स सिक्युरिटी या नावाने जाहिरात दिसली. फिर्यादी यांनी शेअर मार्केटसंदर्भात त्यांचा वॉटसऍप ग्रुप जॉईन केला. सदर ग्रुपचे ऍडमीन असलेल्या कुणाल गुप्ता व जेनीस मेहरा या नावाच्या व्यक्तींनी वॉटसऍपच्या माध्यमातून फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून त्यांना कंपनीच्या लिंकद्वारे डीमॅट अकाऊंट ओपन करण्यास सांगून विविध आयपीओ व शेअर मार्केटमध्ये कमी वेळात जास्त नफ्याचे आमिष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले परंतु प्रत्यक्षात फिर्यादी यांची १७ लाख ८४ हजार रुपयांची फसवणूक झाली असून याबाबत रत्नागिरी सायबर पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com