बारसू रिफायनरी रद्द करण्याचा राष्ट्रीय स्तरावर विचार सुरू
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स (रिफायनरी) प्रकल्प रद्द करून नवीन रिफायनरी स्थापन करण्याचा विचार राष्ट्रीयस्तरावर सुरू झाला आहे. स्थानिकांचा विरोध आणि उपस्थित झालेल्या पर्यावरणीय प्रश्नांमुळे हा प्रकल्प रद्द करून आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि गुजरातमध्ये प्रकल्प उभारणीबाबत जागांची चाचपणी सुरू असल्याच्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीने खळबळ उडाली आहे. मात्र या संदर्भात स्थानिक पातळीवर कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने बारसू रिफायनरी रद्द झाल्याच्या वृत्ताबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.इंग्रजी दैनिकाच्या वृत्तानुसार भारताला इंधनाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी रिफायनरीची गरज असल्याने बीपीसीएल पूर्ण किनारपट्टीवर किंवा पश्चिम किनारपट्टीवर आणखी एका रिफायनरीची योजना आखत आहे. राज्य संचालित एंटरप्राईज सुविधेसाठी आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश आणि गुजरातमधील संभाव्य स्थानांचे मूल्यांकन करत आहे. ज्याची क्षमता १२ एमटीपीए अपेक्षित आहे. ही चर्चा प्राथमिक टप्प्यावर आहे. बीपीसीएल उत्तरप्रदेशला संभाव्य स्थान म्हणूनही विचारात घेवू शकते. छोट्या रिफायनरीवर लक्ष केंद्रीत करणे हे खूप सोयीस्कर आहे. कारण त्यांना सामान्यतः भूसंपादन आणि नियामक मंजुरी यासारख्या कमी आव्हानांचा सामना करावा लागतो. अशा स्वरूपाची चर्चा राष्ट्रीय स्तरावर झाल्याचे इंग्रजी दैनिकाने म्हटले आहे. www.konkantoday.com