चिपळुणात कारचे हप्ते न फेडता कार विक्रीतून साडेसहा लाखाचा अपहार
खरेदी केलेल्या कारचा हप्ता न फेडता कार स्वतःकडे ठेवून यातून साडेसहा लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे घडला. या प्रकरणी अपहार करणार्यावर चिपळूण पोलीस स्थानकात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दानिश यासीन जईकर (४०, मुळ खेड, सध्या-मुरादपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याची फिर्याद शैलेश दीपक आंब्रे (३५, रा. वालोपे, गणेशवाडी, सध्या-मुरादपूर) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश आंब्रे याने आपल्या ओळखीचा दानिश जईकर यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या मालकीची कार ५ फेब्रुवारी २०२४ रोजी नोटरीकरार पत्राद्वारे जईकर याला विकली होती. मात्र दानिश जईकर यांने ठरल्याप्रमाणे गाडीचे हप्ते फेडलेले नाहीत. तसेच कारचा ताबाही स्वतःकडे ठेवून त्यापासून मिळणार्या उत्पन्नाचा स्वतःसाठी वापर करीत होता. त्यामुळे जईकर याने आंब्रे कार स्वतःकडे ठेवून तसेच वाहनाचे हप्ते न फेडता या संदर्भात ६ लाख ४९ हजार ६७८ रुपयांचा अपहार केला. www.konkantoday.com