प्रवाशांची मागणी नसताना धावलेल्या सीएसएमटी-सावंतवाडी एसी स्पेशलला प्रतिसाद नाही
कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम संपुष्टात आलेला असतानाही अन प्रवाशांची कोणतीही मागणी नसतानाही मध्य रेल्वे प्रशासनाने २२ जून रोजी चालवलेल्या सीएसएमटी-सावंतवाडी वातानुकुलीत स्पेशलला प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याचे समोर आले. सावंतवाडीच्या दिशेने जाताना ४५ टक्के तर परतीच्या प्रवासात अवघ्या ५ टक्के प्रवाशांनीच पसंती दिल्याचे समजते. भर पावसात केवळ १ दिवस वातानुकुलीत स्पेशल चालवण्यामागच्या रहस्याचा अद्यापही उलगडा झालेला नाही.www.konkantoday.com