
सुंदरकाण्डाचे पठण दि. ३० जून २०२४ रोजी अतुलितबलधाम, रत्नागिरी येथे आयोजित
भारतवर्षामध्ये तुलसीदासांनी लिहिलेल्या ‘श्रीरामचरितमानस’मधील ‘सुंदरकाण्ड’ हे अत्यंत प्रचलित आहे. समुद्र ओलांडून, लंकेमध्ये असणार्या सीतामातेचा शोध घेण्यापासून ते हनुमंताने केलेले लंकादहन व पुढे प्रभु श्रीरामांनी वानरसेनेसोबत सेतुनिर्माण सुरू करेपर्यंतचा प्रवास म्हणजे ‘सुंदरकाण्ड’! सद्गुरु श्रीअनिरुद्धबापू सांगतात की रामायणामधील सुंदरकाण्ड ही सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. सुंदरकाण्ड म्हणजे आमचे जीवन सर्वार्थाने सुंदर करणारे रामायणातील अत्यंत सुंदर, दैदिप्यमान व तेजस्वी शुभ्रपद शिखर तसेच सेतू बांधणाऱ्या हनुमंताचे चरित्र आहे. ह्या सुंदरकाण्डाचे पठण दि. ३० जून २०२४ रोजी अतुलितबलधाम, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी मोठ्या संख्येने ह्या संधीचा लाभ घ्यावा. वेळ :- रविवार, दिनांक ३० जून २०२४सकाळी ११.३० वा. आणि सायंकाळी ५.०० वा.स्थळ :- अतुलितबलधाम, सह्याद्रीनगर, टी. आर. पी., नाचणे, रत्नागिरी