
चिपळूणमध्ये चौपदरीकरणातील बांधकामे हटवण्यास लोकांचा विरोध
चिपळूण शहर परिसरात चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे व बांधकामे बाजूला करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र ही बांधकामे पावसानंतर काढावीत यासाठी स्थानिक लोकांनी विरोध सुरू केला आहे. या परिसरातील चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली नव्हती त्यानंतर जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर उन्हाळ्याच्या काळात बांधकामे काढण्याचे आदेश दिले होते परंतु पावसात कुठे जायचे असे सांगून लोकांनी त्यावेळी विरोध केला होता त्यामुळे हे काम दोन महिने थांबले होते. आता हे काम परत सुरू झाल्यावर लोकांकडून विरोध सुरू झाला आहे. पावसानंतर बांधकामे काढावीत व नागरिकांच्या शंकांचे निरसन करावे अशी लोकांची मागणी आहे.
www.konkantoday.com