खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसवण्यात आलेले फायटर विमान ऊन पावसातच उघड्यावर
खेड शहरातील प्रबोधनकार ठाकरे उद्यानात बसवण्यासाठी भारतीय वायू सेनादलाकडून प्राप्त झालेल्या फायटर विमानाच्या श्रेयावरून शिवसेना व मनसेत उफाळलेला संघर्ष सर्वांनाच ज्ञात आहे. सलग दोन महिने शिवसेना व मनसेमध्ये श्रेयावरून अक्षरशः रणकंदन माजले होते. एवढेच नव्हे तर तत्कालीन नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी थेट विमानच चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. या तक्रारीचे पुढे काय झाले? याचा उलगडा अद्यापही झालेला नाही. मात्र सध्या फायटर विमानाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्याप कुठलीच खबरदारी घेण्यात आलेली नाही. यामुळे गेल्या ६ वर्षापासून फायटर विमान ऊन, पाऊस, वारा झेलत आहे. www.konkantoday.com