
चिपळूण शहरातील ब्रिटीशकालीन जुन्या पुलांचे होणार स्ट्रक्चरल ऑडिट
चिपळूण शहरातील ब्रिटीशकालीन व जुने पूल भविष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर हद्दीतील सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार पालिकेच्या बांधकाम विभागाने हालचाली सुरू केल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या पुलांचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असा पत्रव्यवहार केला आहे.तीन वर्षापूर्वी शहरातील बहाद्दूरशेखनाका येथील ब्रिटीशकालीन वाशिष्टी पूल भर पावसात खचल्याची घटना घडली होती. महापुरात या पुलाची तातडीने डागडुजी करताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली होती. याशिवाय एन्रॉन पुलही खचला होता. याचवेळी जुन्या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा उपस्थित झाला होता. www.konkantoday.com