रत्नागिरीतील कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज लोकनाट्याचे प्रमुख सुनिल बेंडखळे यांना यंदाचा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार प्रदान

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने यंदाचा पुरस्कार वितरण व कलावंत मेळावा शुक्रवारी मुंबईतील यशवंत चव्हाण नाट्य संकुलात संपन्न झाला. यावेळी कोकणातील लोककला नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडणारे, रत्नागिरीतील कोकणचा साज संगमेश्‍वरी बाज लोकनाट्याचे प्रमुख सुनिल बेंडखळे यांना यंदाचा उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार देवुन ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.रंगभूमीची मध्यवर्ती संघटना असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित नाटककार कै. गो. ब. देवल यांच्या स्मृत्यर्थ पुरस्कार वितरण सोहळा आणि कलावंत मेळावा शुक्रवार दि. १४ जून रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल माटुंगा या ठिकाणी संपन्न झाला. या मेळाव्यात ज्येष्ठ अभिनेते अशोकमामा सराफ व अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना जीवन गौरव पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.पुरस्कार वितरण सोहोळ्याला नाट्य परिषदेचे तहयात विश्‍वस्त शशी प्रभू, नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, स्वाती चिटणीस, विश्‍वस्त अशोक हांडे, पूजा पवार, अभिनेत्री वर्षा उसगावकर, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह अजित भुरे, अभिनेते जयवंत वाडकर, अभिनेते मोहन जोशी, उद्योगमंत्री तथा परिषदेचे विश्‍वस्त ना. उदय सामंत, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर, सहकार्यवाह सुनील ढगे, समीर इंदुलकर, दिलीप कोरके आदी उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button