
आरटीईचे संकेतस्थळ हँग झाल्यामुळे प्रवेश प्रक्रिया लटकली
बालकांच्या मोफत शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेश नोंदणी पूर्ण झाली आहे. दि. ७ जूनला लकी ड्रॉ होणार होता. मात्र आरटीईचे संकेतस्थळ हँग झाल्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया लटकली आहे. सोडत मुदतीला पाच दिवस उलटूनही निवड यादी उपलब्ध होत असल्याने पालकांचा पुरता गोंधळ उडाला आहे. जिल्ह्याचा शिक्षण विबाग याबाबत अनभिज्ञ असून संबंधितांनी आरटीई निवड यादीची ठोस माहिती द्यावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे. www.konkantoday.com