पावसाळ्यात उदभवणार्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर ७०० हून अधिक कर्मचारी राहणार सतर्क
कोकण रेल्वेमार्गावर पावसाळ्यात उदभवणार्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झाले आहे. पावसाळ्यात सातशेहून अधिक रेल्वे कर्मचार्यांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात येणार आहे. असुरक्षित ठिकाणी २४ तास जागता पहारा असेल. तर तीन ठिकाणी २४ ताास नियंत्रण कक्ष कार्यरत राहणार असून ९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डींग पर्जन्यमापक बसवण्यात येणार आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी यास दुजोरा दिला आहे.पावसाळ्यात उदभवणार्याा नैसर्गिक आपत्तीवर मात करण्याच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने सर्वतोपरी तयारी केली असून त्या त्या विभागाच्या सर्व यंत्रणाही आतापासूनच सतर्क झाल्या आहेत. सर्व सुरक्षा श्रेणी कर्मचार्यांना आपत्कालीन परिस्थितीत नियंत्रण स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोन प्रदान केले जाणार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जलदरित्या हालचाल करण्यासाठी बीआरएन माऊंट केलेले उत्खनन नामनिर्देशित बिंदूंवर सज्ज ठेवण्यात येणार आहेत. दोन्ही लोकोपायलट गार्ड ऑफ टेन्सना वॉकीटॉकी सेटही करण्यात आले आहेत.आपत्कालीन संपर्कासाठी एआरएमव्हीमध्ये सॅटेलाईट फोन संपर्कही प्रदान करण्यात आल्याचे समजते. अतिवृष्टी झाल्यास लोकोपायलटना ताशी ४० कि.मी. वेगाने रेल्वेगाड्या चालवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.www.konkantoday.com