ठाकरे गटाने नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरमधला उमेदवार मागे घ्यावा, -काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
महाराष्ट्रात शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत, पण या निवडणुकीआधी महाविकासआघाडीमध्ये घडाघडी पाहायला मिळत आहे.या निवडणुकीवरून काँग्रेसने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिल्याचं बोललं जात आहे.
ठाकरे गटाने नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधरमधला उमेदवार मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. उमेदवार मागे न घेतल्यास काँग्रेस मुंबई शिक्षकचा उमेदवार कायम ठेवेल, असा इशारा काँग्रेसने दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीवरून काँग्रेस आणि शिवसेनेत एकमेकांबद्दल नाराजी दिसत आहे.
दरम्यान विधानपरिषदेच्या उमेदवारांवरून शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेने या 4 मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे, काम केलं आहे. सामंजस्याने बोलणी करून तोडगा काढला जाईल. शिवसेनेत एक सिस्टिम आहे, त्यानुसार संवाद साधला जाईल. 4 जागा परंपरागत पद्धतीने जाहीर केल्या आहेत, याठिकाणी काँग्रेसचा प्रभाव कमी आहे, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.
www.konkantoday.com