
सदनिकेचे खरेदीखत करून देण्याचे ग्राहकमंचाचे बिल्डरला आदेश
सदनिकेचे संपूर्ण रक्कम अदा करूनही सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करून दिले नाही. अथवा ताबाही न दिल्याने बिल्डर विरूद्ध दाखल तक्रारींचा निकाल ग्राहक आयोगाने दिला. यावेळी त्या सदनिकेचे खरेदीखत तक्रारदाराच्या नावे करावे, असा निर्णय देण्यात आला.मृत्यूंजय चंद्रशेखर बेटीगिरी, ओणी-राजापूर यांनी श्री स्वामी समर्थ कन्स्ट्रक्शनकरिता सचिन रामचंद्र मोंडकर (रा. भगवतीनगर, रत्नागिरी) युवराज संभाजी वाघोळे (रा. मुंबई) यांच्याविरूद्ध रत्नागिरीच्या ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. ही तक्रार मंचाचे अध्यक्ष अरूण गायकवाड, सदस्य स्वप्नील मेढे, सदस्या अमृता भोसले यांच्यासमोर सुनावणीस आली. पडवेवाडी, ता. रत्नागिरी येथील मिळकतीत आराध्य रेसीडेन्सी नावाची इमारत बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले.या सदनिकेचे ४७५ चौ. फूट बिल्डअप क्षेत्राची सदनिका १० लाख ४५ हजार रुपयांना विकत घेण्याचे उभयपक्षी ठरले. वेळोवेळी खरेदीदाराने रक्कम दिली. मात्र खरेदीखत होवू शकले नाही. ही बाब समोर आली. युवराज वाघोळे यांनी विकसन करार मोंडकर यांच्याशी केला होता. त्यामुळे सदनिका व्यवहाराशी त्याचा संबंध नसल्याचा निष्कर्ष मंचाने काढला आणि मोंडकर यांनी खरेदीखत ग्राहकाला करून द्यावे व काही रक्कम द्यायची शिल्लक असल्यास ती ग्राहकाने बिल्डरला द्यावी, असे आदेश ग्राहक आयोगाने दिले. www.konkantoday.com