
राजापूर तालुक्यातील आंबोळगड, तुळसुंदेत वीज पडून नुकसान
. राजापूर तालुक्यात गेले २ दिवस विजांचा कडकडाटांसह वादळी वार्यासह पाऊस कोसळत असल्याने आंबोळकड व तुळसुंदे येथे घरावर वीज पडून मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. राजापूर तालुक्यात सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी शेतीची कामेही वेळेत पूर्ण झाली होती. त्यानंतर आता शेती कापणीयोग्य झाली असून काही ठिकाणी भातकापणीला सुरूवातही झाली होती. www.konkantoday.com