
कुवारबाव येथे आजारपणाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; तलावात आढळला मृतदेह
रत्नागिरी : आत्महत्या करायला जात असल्याची चिठ्ठी घरात लिहून ठेवत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह कुवारबाव येथील तलावात आढळून आला आहे. आजारपणाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यश उमेश टाकळे (वय 23, राहणार कुवारबाव, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाचे काका महेश सुधाकर टाकळे यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली. सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी रात्री 9.00 वा. च्या सुमारास यश घरातून निघून गेला होता. जाताना त्याने घरात चिठ्ठी लिहून ठेवली होती. आत्महत्या करायला जात असल्याचे त्यात लिहिले होते. पोलिसांनी कुवारबाव परिसरात शोध घेतला असता तेथील तलावाजवळ त्यांना यशचा मोबाईल सापडला. रात्री उशिरापर्यंत तलावात त्याचा शोध घेण्यात आला. बुधवारी मृतदेह तलावात सापडला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहेत.