
रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी लॅब मिळावी यासाठी प्रयत्न-ना.उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारा चाकरमान्यांचा लोंढा आणि त्यासोबत येणारे कोरोना संकट यावर मात करण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी लॅब मिळावी, अशी चर्चा मंगळवारी सिंधुदुर्ग येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आली. या स्थितीत कुणीही राजकारण करू नये याबाबतही या बैठकीत एकमत झाले आहे. कोरोना तपासणी लॅबबाबत आपण आरोग्यमंत्र्यांशी बोललो असून, मुख्यमंत्र्यांशीही बोलणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात येणार्या प्रत्येक चाकरमान्याची कोरोना तपासणी लवकरात लवकर व्हावी, यासाठी या कोरोना तपासण्या गोव्यातील लॅबमध्ये करण्यास परवानगी द्यावी, यासाठी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशीही बोलणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषदेत दिली.
www.konkantoday.com