
पाली-हातखंबा महामार्गावर कापडगांव येथे टेम्पो पूलावरुन १५ फूट खोल दरीत कोसळून अपघात
पालीचा बाजार करुन परतताना पाली-हातखंबा महामार्गावर कापडगांव येथे टेम्पो पूलावरुन १५ फूट खोल दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला अपघातात जखमी झालेल्या टेम्पो चालकाला तातडीच्या उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पाली येथे या रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. अपघाताची माहिती तत्काळ जगद्गगुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थेच्या रुग्णवाहिकेला कळवताच काही मिनिटातच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर अधिक उपचारासाठी रत्नागिरी येथील सर्वसाधारण रुग्णालय येथे नेण्यात येत आहे.www.konkantoday.com