
रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नियमित अधिक्षकपदी सातारा येथील डॉ. अमोद गडीकर यांची नियुक्ती
रत्नागिरी प्रादेशिक मनोरूग्णालयाच्या नियमित अधिक्षकपदी सातारा येथील डॉ. अमोद गडीकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आपला कार्यभार शुक्रवारी स्वीकारला आहे. गेल्या तीन वर्षापासून नियमित अधिक्षकाचे पद रिक्त होते. या कालावधीत काही वैद्यकीय अधिकार्यांकडे प्रभारी स्वरूपात अधिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रभारींना दुर्लक्ष केल्याने प्रादेशिक मनोरूग्णालयातील अनागोंदी कारभार वाढला होता. मनोरूग्णांना अत्यावश्यक आरोग्य सेवेपासून वंचित रहावे लागले होते. डॉ. अमोद गडीकर यांच्या नियुक्तीमुळे प्रादेशिक मनोरूग्णालयाचा अनागोंदी कारभार कमी होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
www.konkantoday.com