
सर्वाधिक मते मिळालेले उमेदवार नारायण राणे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून विजयी घोषित
रत्नागिरी, दि. 4 (जिमाका) : 46 –रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात आज झालेल्या मतमोजणीत नारायण तातू राणे यांना सर्वाधिक म्हणजेच 4 लाख 48 हजार 514 मते मिळाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी त्यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र दिले. आज सकाळपासून झालेल्या मतमोजणीत उमेदवारनिहाय मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे आहेत. आयरे राजेंद्र लहू – 7,856, नारायण तातू राणे – 4,48,514, विनायक भाऊराव राऊत – 4,00,656, अशोक गंगाराम पवार- 5,280, मारुती रामचंद्र जोशी – 10,039, सुरेश गोविंदराव शिंदे – 2,247, तांबडे अमृत अनंत (राजापूरकर)- 5,582, विनायक लहू राऊत – 15,826, शकील सावंत – 6,395. एकूण वैध मते 9 लाख 2 हजार 395, नोटाला मिळालेली मते 11 हजार 643. सर्वाधित मते मिळालेले श्री. राणे यांना विजयी घोषित करुन निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी प्रमाणपत्र वितरीत केले. यावेळी निवडणूक निरीक्षक भूवनेश प्रताप सिंह, निवडणूक निरीक्षक आर. रेवती, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उमेदवार शकील सावंत, तांबडे अमृत अनंत (राजापूरकर), विनायक लहू राऊत आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया विशेषत: मतमोजणी प्रक्रिया उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांचे आभार मानले. पोलीस यंत्रणा, एसआरपी, सीआरपीएफ यांचेही मनपूर्वक आभार मानले.000