“एक्झिट पोल नुसार निकाल लागला तर!” वडेट्टीवारांनी व्यक्त केली शंका; काहीतरी गडबड!!
एक्जिट पोलनुसार देशभरात मोदीच पुन्हा पंतप्रधान पदी निवडून येणार असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलच्या अंदाजावर विजय वडेट्टीवारांनी शंका व्यक्त केली आहे. ‘सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे एक्झिट पोलचे असे आकडे सांगितले जातात. जनतेचा राग संपूर्ण देशभरातून दिसत होता. परंतु, एक्झिट पोलनुसार जर निकाल आले तर नक्कीच काहीतरी गडबड आहे’, असं सूचक विधान विजय वडेट्टीवार यांनी केलं. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.तर, महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीबाबत चित्र स्पष्ट झालेलं नाही. परंतु, अजित पवार गटाला शुन्य जागा मिळणार असल्याचंही या एक्झिट पोलनुसार अंदाज बांधण्यात आला आहे. तर राज्यात ठाकरे गट दुसरा मोठा पक्ष ठरणार असल्याचंही या एक्झिट पोलवरून स्पष्ट होतंय. यावरून वडेट्टीवार म्हणाले, ‘शिवसेना आणि ठाकरे हे समीकरण आहे. शेती एकाची आणि पेरणाऱ्याने म्हणावं की माझी मालकी आहे. शेतकऱ्याने त्याची जमीन कसायला दुसऱ्याला दिली म्हणजे तोच मालक होत नाही. पक्ष फोडणाऱ्याला मोठी चपराक दिली असल्याचा अंदाज दिसतोय.’*चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया काय?*”राज्यात वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. त्यातही एक दिशा अशी दिसतेय की ३५ च्या पुढे नक्कीच महायुती जाईल. एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर काही बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात ४ तारखेला निकाल हाती येतील तेव्हा बोलू. सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांसाठी मी पूर्ण ठाम आहे. आत्ता हे कल दाखवत असले, तरी महायुतीला महाराष्ट्रात खूप चांगल्या जागा मिळणार आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.www.konkantoday.com