
पावसाळी आपत्तींसाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. संभाव्य पुुरग्रस्त गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ६८ वैद्यकीय पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरूवारी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी पूर परिस्थिती नियंत्रणाबाबत करावयाच्या कामाचा आढावा घेतला. संभाव्य पूरग्रस्त अन जोखीमग्रस्त नदीकाठच्या गावांची यादी प्रसिद्ध करून अशा २०६ गावांच्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याबाबत सूचना त्यांनी सर्व वैद्यकीय अधिकार्यांना दिल्या.जिल्ह्यात मान्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित असते. जून ते सप्टेंबर या महिन्यात कोकणात अतिवृष्टी होत असते. त्यामुळे जिल्ह्यात बर्याच ठिकाणी भूस्सखलन तसेच पूरपरिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत जिल्हा आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. व्ही. जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा हिवताप अधिकारी संतोष यादव, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके आदी उपस्थित होते.पूरपरिस्थिती तसेच पूर ओसरल्यानंतर निर्माण होणारे विविध साथीरोग उदा. अतिसार, काविळ, गॅस्ट्रो यासारखे जलजन्य आजार, डेंग्यू चिकनगुण्या, मलेरिया यासारखे किटकजन्य आजार, लेप्टोस्पायरोसीस तसेच इतर विषाणूजन्य आजार उदभवतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून घेतल्या जाणार्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, याबाबत आढावा बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागाकडून काय खबरदारी पाहिजे आणि कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासंदर्भात किर्तीकिरण पुजार यांनी जिल्ह्यातील आरोग्य अधिकार्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. www.konkantoday.com