महाडचा वरंधा घाट कागदोपत्रीच वाहतुकीसाठी बंद?, प्रत्यक्षात वरंधा घाटातून खुलेआमपणे वाहतूक सुरूच
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वरंधा घाट केवळ कागदोपत्रीच बंद असल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात वरंधा घाटातून खुलेआमपणे वाहतूक सुरूच आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वीच वरंधा घाट धोकादायकच बनला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ठिकठिकाणी धोकादायक स्थिती असून हा हलगर्जीपणा प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता या महामार्गावरून प्रवास करणार्या वाहनचालकांचा जीव टांगणीवरच आहे.महाड तालुक्यातून जाणारा व पुणे जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. म्हाप्रळ-पंढरपूर मार्ग हा पुणे जिल्ह्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने गेली अनेक वर्षापासून मार्गावरून वाहतूक सुरू आहे. वरंधा घाटामुळे यापूर्वी अनेक अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यातील घाटातील रस्त्याचे सद्यस्थितीत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या माध्यमातून रूंदीकरण करण्यात येत आहे. या रूंदीकरणासाठी कोट्यावधी रुपये मंजूर होवूनही दोन वर्षापासून अद्याप महाडपर्यंत पूर्णच झालेला नाही. www.konkantoday.com