रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या स्टाफ पार्किंगमधून दुचाकी चोरीस
कोकण रेल्वेच्या स्टाफ आवारात पार्क केलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. अज्ञाताविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १४ मे ते २१ मे या कालावधीत कोकण रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या रेल्वे स्टेशन आवारात असलेल्या रेल्वे स्टाफ वाहन पार्किंग शेडमध्ये घडली. या दुचाकीची किंमत ८० हजार रुपये आहे. फिर्यादी यांनी रेल्वे स्टाफ वाहन पार्किंगमध्ये शेडच्या समोर दुचाकी पार्क करून ठेवली होती. चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.www.konkantoday.com