संगमेश्वर येथील गणेशकृपा हॉटेलचे मालक घडशी यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
मे महिन्याच्या सुट्टीत गोव्याला फिरण्यासाठी जाणार्या मुंबई येथील सौ. अपर्णा गोसावी यांची २ लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने व कागदपत्रे असलेली पर्स संगमेश्वर येथील गणेशकृपा हॉटेलचे मालक सुनील घडशी यांनी प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.नाश्ता करण्यासाठी त्या थांबलेल्या असताना गोसावी आपली पर्स गणेशकृपा हॉटेलमध्येच विसरून पुढे गोव्याकडे रवाना झाल्या. गोसावी मौल्यवान पर्स विसरून गेल्याचे सौ. घडशी यांच्या निदर्शनास येताच त्वरित त्यांनी ती पर्स आपल्या ताब्यात घेत सौ. गोसावी यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.गोसावी आपल्या कारने पाली येथे पाहोचल्यावर पर्स आपण गणेशकृपा हॉटेलला विसरल्याचे निदर्शनास आले. पर्समध्ये साधारण २ लाख रुपयांचे ३ तोळ्याचे मंगळसूत्र व अर्धा तोळ्याच्या रिंग व अर्धा तोळ्याची अंगठी असे २ लाख ८० हजारचे सोने व महत्वाची कागदपत्रे होती. www.konkantoday.com