मान्सून दोन दिवसांत अरबी समुद्रात दाखल होणार

अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनसाठी पोषक स्थिती असून, येत्या दोन दिवसात तो अरबी समुद्रात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला.यंदा तीन दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. मालदीव, कमोरीन, निकोबार बेटे, अंदमानचा समुद्र त्याने व्यापला आहे. येत्या दोन दिवसात मान्सून दक्षिणपूर्व अरबी समुद्र, मालदीव ककोमोरीनचा आणखी काही भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग तसेच अंदमान निकोबार बेटे व समुद्राचा बराचसा भाग व्यापण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button