4 तारखेला जेव्हा निकाल आल्यावर दुपारी बारा वाजेपर्यंत महायुती ही विखुरलेली आपल्याला पाहायला मिळणार नाना पटोले यांचा दावा

महायुतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं. आताही आहे आणि अजून ते वाढेल. 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर दुपारी बारा वाजेपर्यंत महायुती ही विखुरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे”, असा मोठा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निविर योजना जी आखलेली आहे ती फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ना शहिदांचा दर्जा, ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षांची आहे. नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना फोडून ज्या पद्धतीने महायुती निर्माण केली, आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार आहे हे 4 तारखेला आपल्याला दुपारच्या 12 वाजेपर्यंत कळणार आहे”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button