गजानन किर्तीकरांना शिंदे गटात जाऊ नका असे सांगितले होते
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मुंबईसह राज्यातील १३ जागांवर मतदान पार पडत आहे. यामधल्या मुंबईच्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर हे निवडणूक लढवत आहेत.अमोल किर्तीकर यांच्या विरोधात शिंदे गटाचे रवींद्र वायकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे वडील गजानन किर्तीकर हे शिंदे गटात असल्याने त्यांनी अमोल किर्तीकरांविरोधात प्रचार केला आहे. मात्र आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकर यांच्या पत्नीने आपण अमोल किर्तीकर यांच्यासोबत असल्याचे म्हटलं आहे. गजानन किर्तीकरांना शिंदे गटात जाऊ नका असे सांगितले होते असा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. www.konkantoday.com