इराणचे अध्यक्षांचे हेलिकॉप्टर जळून खाक! इब्राहिम रईसींसह कुणीही वाचले नसल्याची भीती!!
इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी हे हेलिकॉप्टरने अजरबैजानमधून परतत होते. त्याचवेळी त्यांचं हेलिकॉप्टर कोसळलं. १७ तास उलटल्यानंतर हे हेलिकॉप्टर शोध आणि बचाव पथकाला सापडलं आहे. हेलिकॉप्टर जळून खाक झालं आहे. अपघाताचे फोटोही समोर आले आहेत. या अपघातात रईसी यांच्यासह कुणीही वाचलं असण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. रेड क्रिसेंटने याबाबतची माहिती दिलेली नाही.एक ड्रोन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये हेलिकॉप्टर प्रचंड मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त झाल्याचं दिसतं आहे. आता अध्यक्ष रईसी यांच्यासह इतरांचा शोध घेतला जातो आहे. मात्र या घटनेत कुणीही वाचलं असण्याची शक्यता जवळपास शून्य मानली जाते इराण च्या प्रेस टीव्हीने त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे की बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली आहे. त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचं आढळून आलेलं नाही. अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या ताफ्यात एकूण तीन हेलिकॉप्टर्स होती. ज्यातली दोन सुखरुप परतली. मात्र इब्राहिम रईसी आणि परराष्ट्र मंत्री अब्दुल्लाहियन ज्यामध्ये होते ते हेलिकॉप्टर कोसळलं आणि मोठा अपघात झाला. १६ तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. आता या पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले आहेत. मात्र या घटनेत कुणीही वाचलं असण्याची शक्यता नाही.www.konkantoday.com