रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे घरफोडीचा प्रयत्न करणार्या संशयिताला अटक
रत्नागिरी तालुक्यातील खंडाळा येथे घरफोडीची प्रयत्न करणार्या संशयिताला जयगड पोलिसांकडून अटक करण्यात आली. जलील अब्दुल्ला सोलकर (६०, रा. कर्ला, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरूद्ध जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी हा १७ मे २०२४ रोजी रात्रीच्या सुमारास खंडाळा आदर्शनगर येथील घराचे कडी-कोयंडा उचकटण्याचा प्रयत्न करत होता. या गोष्टीची चाहूल येथे वास्तव्य करणारे स्वप्नील भगवान कीर यांना लागली. यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने चोरटा रात्रीच्या अंधाराचा फायदा घेवून त्या ठिकाणाहून पळाला. मात्र पोलीस तपासात हे कृत्य संशयित आरोपीनेच केल्याचे उघडकीस आले. त्यानुसार पोलिसांनी सोलकरविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच संशयिताला पोलिसांकडून अटक करण्यात आली.www.konkantoday.com