
वसई-मडगाव मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली येथे सिंधू एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याची मागणी
कोकण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकसित होत असून, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसह सणासुदीला जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवासी आकडा वाढत आहे. यावर उपाय म्हणून अतिरिक्त रेल्वेगाड्यांची व्यवस्था केली जात असली तरी ती तोकडी पडत आहे.परिणामी यावर उपाय म्हणून वसई-मडगाव (अप आणि डाऊन) मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवली येथे सिंधू एक्स्प्रेस ट्रेन सुरू करण्याची आणि नियमित करण्याची निकड असल्याचे सिधुंदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाचे अध्यक्ष भरत नाईक यांनी सांगितले.सिधुंदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळाकडून केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रानुसार, वसई-मडगाव (अप आणि डाऊन) मार्गे वांद्रे टर्मिनल, बोरिवलीवर सिंधू एक्स्प्रेस ट्रेन नियमित करण्यात यावी, असे नमुद करण्यात आले आहे.www.konkantoday.com