
प्रख्यात बँकर आणि बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे निधन
प्रख्यात बँकर आणि बँकेचे माजी अध्यक्ष नारायणन वाघुल यांचे निधन झाले आहे. 88 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला आहे. नारायणन वाघुल यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.नारायण वाघुल यांना 2009 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं. नारायणन वाघुल यांना आयसीआयसीआय बँकेतील अनेक मोठ्या बदलांचे श्रेय जाते. 1985 मध्ये त्यांनी ICICI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला होता. आयसीआयसीआय बँकेला सार्वजनिक वित्तीय संस्थेतून देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकांच्या यादीत नेण्यासाठी वाघुल यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नातून ICICI ला 1994 मध्ये बँकेचा दर्जा मिळाला. चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी 12:38 वाजता त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.