रत्नागिरी जिल्ह्यातील ८ हजार ७३३ सदनांचे वाटप पूर्ण
कित्येक वर्ष वास्तव्य करूनही स्वतःच्या जमिनीच्या सातबार्यावर महाराष्ट्र शासन अशी नोंद असलेल्या गावठाणामधील ग्रामस्थांना आपल्या जमिनीचा मालकी हक्काचा कागद मिळायला सुरूवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या गावठाण सर्वे नंतर आता १७६ गावांमध्ये तब्बल ८ हजार ७३३ सदनांचे वाटप करण्यात आले. तसेच या सनद वाटपामधून ३३ लाख ७३ हजार ६३७ इतका महसूल सरकारी तिजोरीत जमा झाल्याचे जिल्हा भूमिअभिलेख विभागाकडून सांगण्यात आले.www.konkantoday.com