
गुटख्याची जिल्ह्यात छुप्या मार्गाने जोरदार विक्री सुरूच आहे.
रत्नागिरी, ता. २२ : बंदी असलेल्या गुटख्याची जिल्ह्यात छुप्या मार्गाने जोरदार विक्री सुरूच आहे. निवडणुकीच्या काळात पोलिस आणि प्रशासनाकडून होणाऱ्या वाहनांच्या तपासणीमुळे या मालाचा तुटवडा भासत आहे. विक्रेत्यांनी त्याचा फायदा घेत ब्लॅकने गुटख्याची विक्री सुरू आहे. २५ रुपयाला मिळणारी गुटख्याची पुडी आता ३० रुपये झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचा वचक नसल्याने व्यसनाधीन तरुण आणि प्रौढ ब्लॅकने खरेदी करत असल्याने जिल्ह्यात गुटख्याची तेजीत विक्री सुरू आहे.
राज्यात २० जुलै २०१२ ला गुटखाबंदीचा निर्णय झाला. त्याला १२ वर्षे पूर्ण झाली; पण ना त्याची कडक अंमलबजावणी झाली ना गुटखा विक्री थांबली. शहर किंवा ग्रामीणमधील काही पानटपरी, दुकानांमध्ये गुटख्याची विक्री जोरात सुरूच आहे. गुटखा विक्री होत असतानाही कारवाई होताना दिसत नाही.