
खेड तालुक्यातील भरणे-गवळवाडी येथील जंगलात अज्ञाताचा मृतदेह आढळला
खेड तालुक्यातील भरणे-गवळवाडी येथील जंगलमय भागात १३ मे रोजी सायंकाळच्या सुमारास पडीक शेतात अज्ञाताचा मृतदेह आढळून आला. मानवी सदृश हाडे असलेला सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली. काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर तातडीने पोलीस स्थानकात कळवण्ययात आले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. अज्ञाताच्या मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान येथील पोलिसांसमोर आहे. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. www.konkantoday.com