पेढे येथून लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन अचानक फुटल्याने लाखो लिटर्स पाणी वाया
चिपळूण पेढे येथून लोटे औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करणारी जुनी पाईप लाईन अचानक फुटल्याने पाण्याचे फवारे २० ते २५ फूट कारंज्यासारखे उडून लाखो लिटर्स पाणी वाया गेले, तर परिसरातील अनेक लहानमोठी, दुकाने, टपऱ्यांमध्ये पाणी जाऊन मोठे नुकसान झाले.जुनी पाईप लाईन फुटलेल्या ठिकाणी पाच ते सात फुटाचा मोठा खड्डा पडला असून परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले . या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. ही घटना काल मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान फरशी तिठा येथे घडली.www.konkantoday.com