
उद्योजक किरण सामंत यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी एका दिवसात उभारली निवाराशेड
लांजा बसस्थानकाच्या कॉंक्रीटीकरणाचे काम सुरू असल्यामुळे एसटी बससेवा शहरातील हायस्कूल समोरील किरण सामंत यांच्या शिवसेना संपर्क कार्यालयाच्या पटांगणातून सुरू आहे. सामंत हे लांजा दौर्यावर आले असता त्यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेवून तत्काळ लांजा आगारातील अधिकार्यांशी चर्चा करून एका दिवसात निवाराशेड आणि पाण्याची व्यवस्था करून दिली.लांजा बसस्थानकात कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी बस स्थानक २२ मे पासून बंद ठेवण्यात आले असून बसस्थानकाचे तात्पुरते स्थलांतर लांजा हायस्कूल समोरील पटांगणात करण्यात आले. यावेळी प्रवाशांची निवार्याची सोय कशी करावी हा प्रश्न लांजा आगारप्रमुखांसमोर होता.किरण उर्फ भैय्या सामंत हे लांजा दौर्यावर आले असता त्यांनी आपल्या कार्यालयासमोर एसटी प्रवाशांची गैरसोय पाहून प्रवासी निवार्यासाठी पत्राशेड व पिण्याच्या पाण्यासाठी कुलरची व्यवस्था करण्याचे आदेश आपल्या कार्यालयातील कार्यकर्त्यांना दिले. सध्या असह्य उकाड्याने जनता त्रस्त असल्याने निवाराशेड व पिण्याच्या पाण्याची गरज होती. सामंत यांच्या तत्परतेमुळे हा प्रश्न मार्गी लागला. www.konkantoday.com