गणेशोत्सवात येणार्या चाकरमान्यांना विस्टाडोममध्ये देखील जागा नाही
गणेशोत्सवात येणार्या चाकरमान्यांना विस्टाडोममध्ये देखील जागा नाही कोकण रेल्वे मार्गावरील नयनरम्य हिरवळ धबधबे, नद्या आदींचा नजारा टिपण्यासाठी तेजससह जनशताब्दी एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्यांना प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. सर्व डब्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट भाडे असलेल्या तेजस एक्सप्रेससह जनशताब्दी एक्प्रेसचा गणेशोत्सवातील विस्टाडोम डबा पूर्णपणे आरक्षित झाला आहे. विस्टाडोम डब्यातील तिकिटांसाठी प्रतीक्षा यादीच सुरू झाली आहे. ६ सप्टेंबर रोजीच्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्याची प्रतीक्षा यादीची मर्यादाच संपल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.मध्य रेल्वे प्रशासनाने २०१८ मध्ये सर्वप्रथम मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्प्रेसला काचेचे छत व रूंद खिडक्या असलेला विस्टाडोम डबा जोडला. या डब्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर मुंबई-मडगाव तेजस एक्सप्रेसलाही २०२२ मध्ये दुसरा विस्टाडोम डबा जोडण्यात आला. आलिशान वंदे भारत पाठोपाठ सर्वाधिक जलद गतीने धावणार्या तेजस एक्सप्रेसच्या विस्टाडोम डब्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसात मिळाल्यानंतर आणखी दोन विस्टाडोम डबे जोडत प्रवाशांना विशेषतः पर्यटकांनाा मध्य रेल्वे प्रशासनाने सुखद धक्का दिला होता. www.konkantoday.com