देवरूख पठारवाडी ते वाशी वास्करवाडी या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट स्थितीत
देवरूख पठारवाडी ते वाशी वास्करवाडी या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम गेली सहा महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. मार्गावर खडी पसरली असल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दोन दुचाकीस्वारांचा गाडी घसरून अपघात देखील झाला आहे. बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांनी तात्काळ लक्ष घालून या मार्गाच्या डांबरीकरणाचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत आहे.www.konkantoday.com