
रस्त्यावरील खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे पर्यटकांनी मुरूड कर्दे गावाकडे फिरवली पाठ, पर्यटन व्यवसाय अडचणीत
दापोली तालुक्यातील आसूद ते मुरूड कर्दे या गावाकडे जाणारा रस्ता हा रस्ता नसून खड्ड्याचे साम्राज्य झाले आहे. कारण या भागातून जाताना अनेक पर्यटकांच्या तसेच गावातील लोकांच्या गाड्यांचे नुकसान होत आहे. खड्यातून गाडी काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. अगोदरच रस्ते अरूंद आहेत. त्यात पुन्हा खड्डे त्यामुळे पर्यटकांना आसूदपाासून मुरूडपर्यंत जायला अर्धा ते एक तास लागत आहे. रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी या गावांकडे पाठ फिरवली आहे. या भागामध्ये जाताना रस्ता अरूंद असल्यामुळे गाडी मागेपुढे करायलाही वेळ लागत आहे. सदर रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. परंतु दोन्ही गावांच्या काही तांत्रिक अडचणीमुळे हा रस्ता होत नाही. या रस्त्याचे काम ललवकरात लवकर व्हावे अशी सर्वांचीच इच्छा आहे. कारण पर्यटन वाढीसाठी आपल्याला रस्ता हा व्यवस्थित असणे गरजेचे आहे. www.konkantoday.com