
मतदान केंद्रावरील सर्व मतदान यंत्रे मिरजोळेएमआयडीसी येथील भारतीय अन्नमहामंडळाच्च्या गोदामात कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरक्षित
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया मंगळवारी पार पडली. संपूर्ण मतदार संघात 62.52 टक्के मतदान झाले. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्रे रत्नागिरीकडे रवाना झाली. मतदान केंद्रावरील सर्व मतदान यंत्रे मिरजोळे एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्च्या गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत. या गोदामाला त्रिस्तरीय सुरक्षाकवच ठेवण्यात आले आहे. या गोदामात 4 जूनपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळणार नाही. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान यंत्र सील करण्यात आली. ही मतदान यंत्रे गाड्यांमधून रत्नागिरीकडे पाठवण्यात आली. रत्नागिरी एमआयडीसी येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही सर्व मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. या गोदामाभोवती कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गोदामात त्रिस्तरीय सुरक्षाकवच असणार आहे. सर्वात आतमध्ये सीआरपीएफची एक फलटण असेल. या पथकामध्ये एक अधिकारी आणि तीस कर्मचारी असतील. दुसऱ्या स्तरामध्ये राज्य राखीव दलाचे एक पथक असेल. त्या पथकामध्ये तीस कर्मचारी आणि एक अधिकारी असतील. गोदामाच्या बाहेरच्या आवारात स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये दहा पोलीस कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. चौवीस तास आळीपाळीने हा बंदोबस्त राहणार आहे.www.konkantoday.com