राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात ईर्ष्येने 61 टक्क्यांवर मतदान; तीन पाटलांचे भवितव्य यंत्रात कैद
राज्यात लक्षवेधी ठरलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपवाद वगळता चुरशीने आणि शांततेत ६१ टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली. सायंकाळी सहा वाजता मतदानाची वेळ संपली, मात्र सुमारे १२० ठिकाणी रात्री सातनंतरही मतदान सुरू होते. त्यामुळे मतांचा टक्का वाढेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्राथमिक माहितीनुसार ११ लाख २० हजारांहून अधिक मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी (ता. ८) दुपारी दोन वाजेपर्यंत होण्याची शक्यता आहे.भाजप उमेदवार खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर, अपक्ष विशाल पाटील असा थेट सामना झाल्याचे चित्र आज दिसले. शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हेही आपले नशीब आजमावत आहेत. या तीनही पाटलांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद झाले. ४ जून रोजी निकाल असेल. तोवर मतपेट्या सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात रवाना केल्या. तीनही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.www.konkantoday.com