
कंत्राटीकरण व खासगीकरण तसेच नोकर कपात धोरण मागे घ्यावे व अन्य मागण्यांसाठी,राज्य सरकारी कर्मचार्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे.
कंत्राटीकरण व खासगीकरण तसेच नोकर कपात धोरण मागे घ्यावे, शासनाच्या नव्या शैक्षणिक आदेशानुसार ग्रामीण प्राथमिक शाळा बंद करू नयेत, आदी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य कर्मचारी समन्वय समितीच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.
समन्वय समितीचेअध्यक्ष राजन कोरगांवकर, सरचिटणीस सत्यवान माळवे, राजन वालावलकर, कोकण सहसचिव सखाराम सपकाळ, मुख्यद्यापक संघटना अजय शिंदे, माध्य शिक्षक संघटना संजय वेतोरेकर, शंकर जाधव, आरोग्य संघटनेच्या अध्यक्ष विनिता मुंज, सचिव सुयना मसगे, सुरेखा शिंगाडे, वर्षा गंगावणे, हिरा जाधव आदींसह विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य या आदोंलनात सहभागी झाले होते.