१८० ज्येष्ठ मतदारांच्या घरी निवडणूक विभागाची टीम दोन वेळा जाऊनही ते उपलब्ध झाले नसल्याने त्यांनी मतदानाचा हक्क गमावला
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करण्याचा अधिकारी निवडणूक विभागाने दिला आहे. त्यामध्ये सहमती मिळालेल्या २ हजार ६७३ मतदारांपैकी २ हजार ४९३ मतदारांनी मतदान केले.त्यामध्ये सहमती मिळालेल्या २ हजार ६७३ मतदारांपैकी २ हजार ४९३ मतदारांनी मतदान केले. ९४ टक्के हे मतदान झाले आहे. उर्वरित १८० मतदारांच्या घरी निवडणूक विभागाची टीम दोन वेळा जाऊनही ते उपलब्ध होऊ शकलले नाहीत. त्यामुळे या मतदारांनी आता मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. १२ दिव्यांग मतदारांनाही याचा फटका बसला आहे.www.konkantoday.com