मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे बहुतांशी काम पूर्णत्वास गेले आहे. आता घाटातून प्रवास करताना वाहनांचा वेगही वाढला आहे; मात्र काही ठिकाणी संरक्षक भिंतीचे कामही अजून अपूर्ण आहे. त्यामुळे यावर्षीच्या पावसाळ्यात घाटातील सुरक्षितता समाेर येणार आहे.महामार्ग चौपदरीकरणात परशुराम घाटातील काम सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. चौपदरीकरणातील जमिनीच्या मोबदल्यावरून परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. सुरुवातीला प्रशासनाने सूचना करूनही ठेकेदार कंपनी या भागात स्थानिक वादामुळे काम करण्यास तयार नव्हता; मात्र त्यानंतर अत्यंत घाईघाईने काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याचे परिणाम मागील वर्षी पहिल्याच पावसात दिसले. अनेक ठिकाणी काँक्रीटीकरणाचा भाग खचला हाेता. विशेषतः घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी रस्ता खचला होता. त्या ठिकाणी नव्याने काँक्रीटीकरणाचे काही महिन्यांपूर्वीच पूर्ण केले.www.konkantoday.com