कोंकण रेल्वे संगमेश्वर रेल्वे स्टेशन मध्ये सुविधा आणि गाड्यांच्या थांब्यासाठी संघर्ष करणा-या पत्रकार संदेश जिमन यांचा मुंबईत होणार विशेष सन्मान
कोंकण रेल्वे मार्गावरील संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकांवरील समस्या सोडवुन प्रवाशांना सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष करणा-या मुळच्या संगमेश्वरच्या आणि ठाण्यात वास्तव्यास असणा-या पत्रकार संदेश जिमन यांच्या कार्याची “शिवभक्त कोंकण आणि निलक्रियेटर” या संस्थानी दखल घेतली असून या संस्था येत्या २६ मे रोजी श्री जिमन यांचा विशेष सन्मान करणार आहेत. ▪️मुंबईतील गिरगांवच्या साहित्य संघ मंदिरात सकाळी ९-३० वाजता होणा-या या कार्यक्रमास कोंकण वासीयानी आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.