
कोकणच्या विकासाच्या विषयावर चर्चेसाठी समोर या, नारायण राणे यांचे आवाहन
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील खासदारांनी त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्यासमोर एकदा यावे, नेमके त्यांनी जिल्हा व मतदारसंघाच्या विकासासाठी किती योगदान दिले. याची खुलेपणाने चर्चा करावी. आतापर्यंत खासदारांनी प्रत्येक विकासकामांमध्ये विरोधाची भूमिका घेतली. मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी येथील काम शिवसेनेला पैसे मिळाले नाहीत म्हणून रखडले. उद्धव ठाकरे आता शिव्या देण्याचे काम करीत आहेत. मुंबईमधून मराठी माणसाला तडीपार करण्याचे काम ठाकरे शिवसेनेने केले आहे. ठाकरेंनी हिंदुत्वाशी गद्दारी केली, असा आरोप केंद्रीयमंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केला. www.konkantoday.com