दामले हायस्कूल मतदान केंद्रावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट वेब कास्टींगची घेतली रंगीत तालिम
रत्नागिरी, : निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी येथील दामले हायस्कूल मतदान केंद्रावर भेट दिली. या ठिकाणी वेब कास्टींगची रंगीत तालिम घेतली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी मिरजोळे एमआयडीसी येथील शासकीय गोदामातील मतमोजणी केंद्रालाही भेट दिली. येथील सुविधा, नियोजन याबाबत पाहणी करुन, आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल गायकवाड, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.www.konkantoday.com